पुणे – राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पुण्याचा दौरा करीत आढावा घेत “स्मार्ट सिटी’च्या “वॉर रूम’ला भेट देत संपूर्ण माहिती घेतली.
करोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता राष्ट्रवादी कॉंग्रेस नेते शरद पवार आज पुणे दौऱ्यावर होते. त्यांनी स्मार्ट सिटीच्या वॉर रूमला भेट दिली. पुण्यातील भेटीत पवार यांनी करोनासंदर्भातील परिस्थिती जाणून घेतली. यावेळी त्यांनी अधिकाऱ्यांनाही काही सूचना केल्या. याचाच एक भाग म्हणून पवार, टोपे आणि देशमुख यांनी करोनासंबंधी विकसित केलेल्या संगणक प्रणालीची माहिती घेतली.
सिंहगड रस्त्यावरील स्मार्ट सिटीच्या वॉर रूमला भेट देऊन बाधित रुग्ण, प्रतिबंधित क्षेत्र, रुग्ण वाढत असलेला परिसर या बाबतही माहिती घेतली.