सातारा – जिल्ह्यातील पाच जणांचा करोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने बुधवारी सकाळी दिली. तर रात्री उशिरा 14 जण पॉझिटिव्ह आले. ओझरे (ता. जावळी) येथील 5 वर्षीय करोनाबाधिताचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. जिल्ह्यातील दोन रुग्णांनी बुधवारी करोनावर मात केली. 148 जणांच्या घशातील स्त्रावाचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. तर 305 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत.
जिल्ह्यात आजकरोनाग्रस्तांची संख्या 866 वर पोहचली आहे. तर 680 रुग्णांनी करोनावर मात केली आहे. करोनामुळे 41 जणांचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यातील 131 तर जिल्ह्याबाहेरून आलेल्या चार अशा 135 जणांवर सध्या उपचार सुरू आहेत. पुण्यातील एनसीसीएस यांच्याकडून मंगळवारी रात्री उशिरा आलेल्या रिपोर्टनुसार कराड तालुक्यातील बनवडी येथील 32 वर्षीय पुरुष, तारुख येथील 25 वर्षीय महिला, पाटण तालुक्यातील शेजवलवाडी येथील 49 वर्षीय महिला, बोंडरी येथील 34 वर्षीय पुरुष व सातारा येथील वाढे फाटा येथील 56 वर्षीय महिला अशा एकूण पाच रुग्णांचा रिपोर्ट करोनाबाधित आल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली.
रात्री उशिरा आलेल्या 14 जणांमध्ये पाटण तालुक्यातील शितपवाडी येथील 72 वर्षीय पुरुष, पालेकरवाडी (बहुले) येथील 50 वर्षीय पुरुष व 65 वर्षीय महिला, कराड तालुक्यातील रेठरे खुर्द येथील 45 वर्षी महिला, तारुख येथील 20, 40, 56, 40 व 45 वर्षीय पुरुष व सात वर्षीय मुलगी, वाई तालुक्यातील कवठे येथील 20 वर्षीय पुरुष, एकसर येथील 25 वर्षीय पुरुष, कोरेगाव तालुक्यातील पिंपोडे बुद्रुक येथील 35 वर्षीय पुरुष, सातारा तालुक्यातील गोवे (लिंब) येथील 36 वर्षीय पुरुष यांचा समावेश आहे.
तसेच दि. 2 जून रोजी मुंबई येथून प्रवास करुन आलेल्या ओझरे (ता. जावली) येथील 75 वर्षीय करोनाबाधित पुरुषाचा कृष्णा मेडिकल कॉलेजमध्ये उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे, अशी माहितीही डॉ. गडीकर यांनी दिली.
साताऱ्याच्या क्रांतिसिंह नाना पाटील जिल्हा सर्वसाधारण रुग्णालयात दाखल असलेल्या स्टाफ नर्स खिंडवाडी येथील 44 वर्षीय महिला व खावली करोना केअर केंद्रात दाखल असलेल्या साताऱ्यातील बारावकरनगरमधील निशिगंधा कॉलनीतील 42 वर्षीय पुरुष अशा एकूण 2 रुग्णांना बुधवारी 10 दिवसानंतर
डिस्चार्ज देण्यात आला आहे, अशी माहिती त्यांनी दिली. क्रांतीसिंह नाना पाटील जिल्हा सर्वसाधारण रुग्णालयातील 18, कृष्णा मेडिकल कॉलेजमधील 36, वेणूताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालयातील 14, फलटणच्या उपजिल्हा रुग्णालयातील 8, कोरेगावच्या ग्रामीण रुग्णालयातील 6, वाई 11, शिरवळ 13, पानमळेवाडी 3, दहिवडी 39 अशा एकूण 148 जणांच्या घशातील स्त्रावांचे नमुने पुण्यातील एनसीसीएस व कराडच्या कृष्णा मेडिकल कॉलेजकडे तपासणीकरीता पाठविण्यात आले आहेत, असे त्यांनी सांगितले. मंगळवारी रात्री उशीरा एनसीसीएस व कराडच्या कृष्णा मेडिकल कॉलेज यांच्याकडून 305 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले असल्याची माहिती डॉ. गडीकर यांनी दिली.