चिंबळी – लॉकडाऊनमुळे चिंबळी (ता. खेड) परिसरातील सर्वच मंदिर बंद आहेत. परिसरात सर्वत्र धुळ साचली आहे, त्यामुळे महिन्यापासून बचत गटांच्या महिला दर मंगळवारी मंदिर परिसर चकाचक करीत आहेत. चिंबळी येथील श्रीकाळ भैरवनाथ, हनुमान, महादेव, सावतामाळी, पद्मावती मंदिराची या महिलांद्वारे साफसफाई करण्यात येत आहे.
–यामध्ये संगीता बटवाल, पुष्षा खंडागळे, बबिता बटवाल, शालन पाटोळे, भीमाबाई बटवाल यांनी पुढाकार घेत साफसफाई करीत आहेत. संत शिरोमणी सावता महाराज, विठ्ठल-रुक्मिणी मंदिर परिसरात पद्मावती तरुण मंडळाचे अध्यक्ष समीर बनकर, उपाध्यक्ष किशोर बनकर, खजिनदार राजू विधाटे, सहखजिनदार संतोष सातव, ढोल-ताशा पथक अध्यक्ष अंकुश कुदळे आदींनी तणनाशक औषध फवारणी केली.