ढाका – बांगलादेशातील करोनाचा प्रसार रोखण्याच्या प्रयत्नाचा भाग म्हणून सार्वजनिक प्रशासन मंत्रालयाने देशातील दहा जिल्ह्यांमध्ये रेड झोन अंतर्गत येणाऱ्या काही भागांसाठी सरसकट सुट्टी जाहीर केली आहे. करोनाचा प्रसार रोखण्यासाठी चट्टोग्राम, बोगुरा, मौलवी बाजार, चुआडंगा, जशोर, मदारीपूर, नारायणगंज, हबीगंज, मुंशीगंज आणि कमिला जिल्ह्यांतल्या अनेक ठिकाणी रविवारपासून कडक बंदोबस्त ठेवला आहे.
या भागातील सर्व शासकीय व खासगी कार्यालये बंद राहतील. तथापि, आपत्कालीन सेवा कार्यरत राहतील. चट्टोग्रामच्या भागात, चुआडंगा येथे 8 जुलैपर्यंत लॉकडाऊन राहणार आहे. स्थानिक प्रशासनाने विविध जिल्ह्यांसाठी लॉकडाऊनच्या कालावधीच्या वेगवेगळ्या तारखा जाहीर करण्यात आल्या आहेत.
दरम्यान, सोमवारी करोनामुळे बांगलादेशातील मृतांचा आकडा 1,500 च्यावर गेला आहे. गेल्या 24 तासांत 38 जण मृत्युमुखी पडले आहेत.