मुंबई – सामाजिक उपक्रमांवर कंपन्यांनी खर्च करण्यासाठी राखून ठेवलेल्या निधीपैकी जवळजवळ निम्मी रक्कम पंतप्रधान केअर्स फंडाला पाठविण्यात आली आहे.
प्राप्त माहितीनुसार या कंपन्यांनी पंतप्रधान फंडासाठी 3,316 कोटी रुपये उपलब्ध केले आहेत. त्यात देशातील 113 मोठ्या कंपन्यांनी दिलेल्या 3,221 कोटी रुपयांचा समावेश आहे.
या संदर्भातील माहिती संकलित केलेल्या क्रिसील या संस्थेने म्हटले आहे की, करोनाचा प्रादुर्भाव झाल्यानंतर सरकारने कंपन्यांना सामाजिक उपक्रमासाठीची रक्कम पंतप्रधान केअर फंडासाठी देऊ शकतात असे सांगितले होते. या फंडातून व्हेंटिलेटरसाठी 2 हजार कोटी रुपये, स्थलांतरित कामगारांना त्यांच्या घरी परत जाण्यासाठी 1 हजार कोटी रुपये तर लस विकसनासाठी 100 कोटी रुपये उपलब्ध करण्यात आले आहेत.