नवी दिल्ली : रुग्णालयाच्या निष्काळजीपणामुळे वडिलांच्या दोन मृतदेहावर अंत्यसंसकार करण्याची वेळ येथील नागरिकावर आली. हा संतापजनक प्रकार लोकनायक जयप्रकाश नारायण रुग्णालयात घडला.
कलामुद्दीन यांनी ऐय्याजुद्दीन यांच्या मोठ्या भावाच्या आणि स्वत:च्या वडिलांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केले. ऐय्याजुद्दीन हे आपल्या मृतदेहाचा ताबा घेण्यास गेल्यावर ही बाब उघड झाली. ते म्हणाले, सुमारे 250 मृतदेह पाहिल्यावर माझ्या भावाचा मृतदेह नसल्याचे लक्षात आले. त्यांनी चौकशी केली असता त्यांच्या भावावर वेगळ्याच कुटुंबाने दिल्लीगेट दफनभूमीत अंत्यसंस्कार केले. त्यांनी त्या कुटुंबाशी दफन केलेल्या व्यक्तीचा फोटो मागितला असता तो त्यांच्या भावाचा असल्याचे स्पष्ट झाले.
मृतदेह ओळखण्यात गफलत झाली असली तरी कलामुद्दीन यांच्या कुटुंबियांना योग्य ती कागदपत्रे देण्यात आली आहे. मृत्यूनंतर काही वेळेस चेहऱ्यावरील बदलेल्या भावामुळे पार्थीव ओळखण्यात गफलत होऊ शकते, असे रुग्णालयाच्या सुत्रांनी सांगितले.