श्रीनगर : केंद्रीय राखीव पोलिस दलाच्या एका 40 वर्षीय जवानाचा करोनामुळे मृत्यू झाला. जम्मू काश्मिरमध्ये संरक्षण दलात कोरोनाने गेलेला हा पहिला बळी आहे.
हा जवान अनंतनाग येथे तैनात होता. त्यांना श्वसनाचा त्रास होऊ लागल्याने गुरूवारी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्याची कोरोना चाचणी घेण्यात आली. शुक्रवारी ती पॉझिटिव्ह असल्याचे निष्पन्न झाले.
उपचार सुरू असतानाच त्यांची प्रकृती खालावली. त्यातच हृदयविकाराचा झटका आल्याने ते मरण पावले, असे रुग्णालयाच्या सुत्रांनी सांगितले.
जवानाच्या या मृत्यूमुळे जम्मू काश्मिरमधील कोरोना बळींची संख्या 42 वर पोहोचली आहे. त्यात या भागाबाहेरील दोघांचा समावेश आहे. हा जवान उत्तर प्रदेशमधील होता.