पुणे(प्रतिनिधी) : निसर्ग चक्रीवादळाचा धोका लक्षात घेत, आपत्ती व्यवस्थापनासाठी एनडीआरएफच्या 15 तुकड्याबरोबरच नौदलाच्याही तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत. नौदलाच्या पश्चिम मुख्यालयातर्फे नौदलाच्या पाच बचाव तुकडया आणि डीप सी डायव्हर्सच्या तीन तुकड्या मुबंई येथे सज्ज ठेवण्यात आल्या आहेत.
त्याचबरोबर कारवार, गोवा आणि गुजरात येथील किनारी भागांमध्येही नौदलाच्या आपत्ती व्यवस्थापन तुकड्या सज्ज ठेवण्यात आल्या आहेत. बचाव कार्याबरोबरच मदत कार्यासाठीही पुरेशी साधनसामग्री या तुकड्यांना देण्यात आली असून, राज्य सरकारच्या समन्वयाने या तुकड्या बचाव आणि मदत कार्यासाठी तैनात केल्या जातील.