बॉलीवूड अभिनेत्री नताशा स्टॅनकोविच ही तिच्या चित्रपटांपेक्षा भारतीय क्रिकेटपटू हार्दिक पांड्याशी असलेल्या संबंधांमुळे चर्चेत असते. हार्दिकने नताशाशी साखरपुडा करून सर्वांना चकित केले होते. आता हार्दिक पांड्याने आणखी एक गुड न्यूज शेअर केली आहे. नताशा लवकरच हार्दिकच्या मुलाची आई होणार आहे.
या फोटोसह हार्दिकने एक भावनिक पोस्ट देखील लिहिले आहे. त्याने लिहिले आहे की, नताशा आणि माझा एक खूपच सुंदर असा प्रवास सुरू आहे आणि तो आणखी चांगला होणार आहे. आम्ही लवकरच एकाला नवीन जीवाला जन्म देणार आहोत. आम्ही या सर्वात विशेष क्षणासाठी रोमांचित असून तुमच्या प्रेमाची आणि आशीर्वादाची गरज आहे.
या फोटोत हार्दिक पांड्यासह नताशाचा बेबी बंप दिसत आहे. हार्दिक पांड्याने याची घोषणा करताच मित्र आणि चाहत्यांनी त्याचे अभिनंदन केले. इतकेच नव्हे तर हार्दिक पांड्याने आणखी एक फोटो शेअर केला आहे, ज्यात या दोघांनी गुपचूप लग्न केल्याचे दिसून येत आहे.
दरम्यान, नताशा ही मूळची सर्बियाची आहे. बॉलीवूडमध्ये तिने “सत्याग्रह’ चित्रपटातून डेब्यू केले होते. तसेच ती “नच बलिए 9′ या रियॅलिटी शोमध्ये झळकली होती.
Very Nice News. Thank You.