बारामती : बारामती तालुक्यातील आणखी दोघांना कोरोनाची लागण झाल्याचे तपासणी अहवालात निष्पन्न झाले आहे. सिद्धेश्वर निंबोडी येथील रुग्णांच्या संपर्कातील 20 वर्षीय तरुणास कोरोनाची बाधा झाली आहे. तसेच कोऱ्हाळे बुद्रुक येथील 90 वर्षीय वृद्ध व्यक्ती कोरोना संक्रमित असल्याचे आढळून आले आहे. बारामतीतील कोरोना संक्रमितांची संख्या 19 वर पोहोचली आहे .त्यामुळे ग्रामीण भागातील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव चिंतेचा विषय बनला आहे.
तालुक्यातील सिद्धेश्वर निंबोडी येथील कोरोना संक्रमित दोन रुग्णांच्या संपर्कातील 31 जणांची covid-19 चाचणी करण्यात आली . त्यातील 20 वर्षीय तरुणास कोरोनाची लागण झाली आहे . इतर 30 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले असल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर मनोज खोमणे यांनी दिली.
तसेच कोराळे बुद्रुक येथील 90 वर्षीय वृद्ध व्यक्ती देखील कोणा संक्रमित असल्याचे आढळून आले आहे. कोऱ्हाळे बुद्रुक गाव प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आले आहे. गावच्या सीमा बंद करण्यात आले असून पाच किलोमीटरचा परिसर बफर झोन म्हणून घोषित केला आहे. अत्यावश्यक कारणाशिवाय नागरिकांनी घराबाहेर पडू नये प्रशासनास सहकार्य करावे असे आवाहन प्रांताधिकारी दादासाहेब कांबळे यांनी केले आहे.