निमोणे -शिरूर तालुक्यातील चिंचणी येथे मुलीचे जमलेले लग्न मोडल्याप्रकरणी तीन तरूणांवर शिरूर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला. याबाबत पीडित मुलीच्या आईने फिर्याद दिली आहे. राहुल भिसे, सोमनाथ भिसे, किरण भिसे (रा. गुंडेगाव, ता. जि. अहमदनगर) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.
पीडित मुलगी घरी एकटी असताना 19 मे रोजी दुपारी बाराच्या सुमारास राहुल भिसे, सोमनाथ भिसे, किरण भिसे हे आले. त्यांनी ही मुलगी व राहुल भिसे यांचे एकत्र सोबत फोटो काढले. हे फोटो मुलीचे लग्न जमलेल्या मुलास फोटो पाठवून लग्न मोडले.