आळंदी -करोनाच्या पार्श्वभूमीवर आळंदी शहरात खेड तालुक्याबाहेरील नागरिकांना लग्न करण्यासाठी बंदी असतानाही एका मंगल कार्यालयासह धर्मशाळेत बाहेरील लग्न लावल्याप्रकरणी पोलिसांनी कार्यालय व धर्मशाळा मालकांवर गुन्हा दाखल केला आहे.
येथील एका मंगलकार्यालयात दुपारी 12 वाजता मावळ तालुक्यातील मंडळी विवाहासाठी आले होते. तर वडगाव घेनंद रस्त्यावरील एका धर्मशाळेत असाच प्रकार घडल्याने आळंदी पोलिसांनी कार्यालय व धर्मशाळा मालकावर 188 प्रमाणे गुन्हा दाखल केला आला आहे.