मंचर (संतोष वळसे पाटील) : आंबेगाव तालुक्यातील साकोरे येथे मुंबई येथुन आलेला ३६ वर्षीय नागरिक कोरोना पॉझिटिव्ह निघाल्याने परिसरातील नागरिक भयभती झाले आहे.संबधित व्यक्तीस पुढील वैद्यकीय उपचारासाठी यशवंतराव चव्हाण रुग्णालय पिंपरी-चिंचवड येथे दाखल करण्यात आल्याची माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.सुरेश ढेकळे यांनी दिली.
मुंबई येथे संबधित व्यक्तीचा जवळचा नातेवाईक कोरोना रोगामुळे मृत्यु पावला.त्यानंतर सासु सासरे यांना शिरुर तालुक्यातील एका गावी सोडुन आपल्या मुळ गावी साकोरे येथे शुक्रवार दि.१५ रोजी रात्री आला.तसेच मुंबई येथुन त्याचे भाऊ आणि घरातील इतर ११ सदस्य साकोरे गावी आले. त्यांना गावापासुन दुर असणाèया वस्तीवर क्वारंटाईन करण्यात आले होते. त्यातील ३६ वर्षीय तरुणाची तब्येत बिघडली.त्यामुळे त्यास आणि पत्नीस वैद्यकीय उपचारासाठी यशवंतराव चव्हाण रुग्णालयात पाठविले.तेथे पत्नीचा रिपोर्ट कोरोना निगेटिव्ह आला.
परंतु ३६ वर्षीय तरुणाचा वैद्यकीय रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आल्याची माहिती आंबेगाव तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.सुरेश ढेकळे यांनी दिली.वैद्यकीय रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आल्याने तहसिलदार रमा जोशी,गटविकास अधिकारी जाqलदर पठारे,मंचर पोलिस ठाण्याचे पोलिस निरिक्षक कृष्णदेव खराडे,तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.सुरेश ढेकळे यांनी साकोरे गावी मंगळवार दि.१९ रोजी धाव घेवुन ग्रामस्थांना सतर्कता बाळगण्याचे आवाहन केले.
साकोरे गावात बाहेर गावावरुन येणारे सर्व रस्ते बंद करण्यात आल्याची माहिती उद्योजक विनोद मोढवे यांनी दिली. गावातील नागरिक घरात थांबणार असुन बाहेर गावावरुन गावात कोणीही येवु नये, असे आवाहन सरपंच मिराबाई बीडकर आणि ग्रामपंचायत सदस्या जयश्रीताई विनोद मोढवे यांनी केले आहे.गावातील रस्ते आणि परिसराची फवारणी करुन निर्जतुकीकरण करुन गावात स्वच्छता केली जाणार आहे.