नवी दिल्ली : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डॉनाल्ड ट्रम्प यांनी चीनवर कोरोनासंदर्भात माहिती लपवल्याचा आरोप केला होता. आता ट्रम्प यांचा हा दावा खरा होताना दिसत आहे. कारण, चीनने स्वतःयाविषयी कबुली दिली आहे. सुरुवातीच्या काळातच कोरोना विषाणूचे नमुने नष्ट केल्याचा खुलासा चीनच्या राष्ट्रीय स्वास्थ्य आयोगाचे निरीक्षक यू डेंगफेंग यांनी केला आहे. त्यांच्या या खुलाशामुळे एकच खळबळ उडाली आहे.
यू डेंगफेंग यांनी याविषयी माहिती देताना म्हटले, हे नमुने चीनमधील जैविक प्रयोगशाळेत नष्ट करण्यात आले. आधी हे नमुने सत्य लपवण्यासाठी नव्हे तर जैविक प्रयोगशाळेच्या सुरक्षेच्या हेतूने नष्ट करण्यात आले आहे. शिवाय अधिकृतरित्या त्या प्रयोगशाळेत नमुने ठेवता येत नव्हते. त्यामुळे चीनी सार्वजनिक स्वास्थ्य कायद्यांतर्गत नमुने नष्ट करावे लागले असल्याचे त्यांनी यावेळी म्हटले.
तर, तिकडे अमेरिकेचे परराष्ट्र सचिव माईक पॉम्पियो यांनी गेल्या महिन्यातच चीनने कोरोनाचे नमुने नष्ट केल्याचा आरोप केला होता. पॉम्पियो म्हणाले ,आम्हाला चीनी कम्युनिस्ट पक्षाने देखील जागतिक आरोग्य संघटनेला कोरोना व्हायरसच्या प्रादुर्भावाविषयी वेळेत माहिती दिली नव्हती. प्रत्येक प्रांतात विषाणूचा प्रसार होईपर्यंत चीनने संसर्गाच्या प्रसाराची माहिती लपविली. चीनच्या या कबुलीजबाबमुळे अमेरिकेची शंका आणखीनच वाढेल.