मुंबई – विद्या बालन साकारत असलेल्या शकुंतला देवींवरील सिनेमा पुढच्या वर्षी मे महिन्यात रिलीज होणार आहे. 8 मे रोजी हा बायोपिक रिलीज होणार होती. विद्या बालन ज्यांचा रोल करते आहे, त्या शकुंतला देवींना “ह्युमन कॉम्प्युटर’ असे म्हटले जात असे. विद्याने इन्स्टाग्रामवर पोस्ट केलेल्या व्हिडीओमध्ये आपल्या सिनेमाची रिलीज डेट जाहीर केली आहे. मात्र, आता हा चित्रपट अमेजन प्राइम वीडियो रिलीज होणार आहे. हा चित्रपट 12 जून ला रिलीज होणार आहे.
दरम्यान, याच चित्रपटाच्या टिझरमध्ये विद्या अगदी शकुंतल देवींसारखीच दिसते आहे. तर आता या चित्रपटाची रिलीज डेट इंस्टाग्रामवर हटके अंदाजात शेअर केली आहे. शकुंतला देवी या लेखिका आणि मेंटल कॅल्क्युलेटर होत्या. त्या कॅल्क्युलेटर शिवाय कोणतेही गणित सहज सोडवू शकत असायच्या.
त्यांच्या या अलौकिक क्षमतेमुळेच त्यांना “ह्युमन कॉम्प्युटर’ असे म्हटले जात असायचे. त्यांच्या या क्षमतेमुळे त्यांचे नाव गिनिज् बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डसमध्येही नोंदवले गेले होते. त्यांच्यावरील सिनेमा करायचे जेंव्हा ठरले तेंव्हा विद्या बालनला तो रोल द्यायचा, असेच ठरवले गेले होते.
अनु मेनन या सिनेमाचे दिग्दर्शन करत आहेत. या सिनेमाच्या तयारीसाठी विद्याने मुद्दाम बॉब कट करून घेतला आहे. गणिताची समिकरणे तोंडी सोडवण्याचीही ती सवय करते आहे. स्क्रीप्टमध्ये तिच्यासाठीच्या रोलनुसार शकुंतला देवी बनण्यासाठी दिसण्याबरोबरच गणिताची अधिक तोंडओळख करण्याचाही ती सराव करते आहे.