पुणे : कोरोना विषाणू प्रादुर्भाव नियंत्रणाकरिता क्षेत्रीय कार्यालय स्तरावर येणाऱ्या समस्या तसेच या आजारावर नियंत्रण मिळविण्यासाठी करण्यात येत असलेल्या उपाय योजनांचा आढावा घेण्यासाठी पालिकेचे सभागृहनेते धीरज घाटे यांनी सर्व क्षेत्रीय कार्यालय स्तरावर 16 मे पर्यंत बैठका बोलविल्या आहेत. या बैठकीत प्रशासनासह, त्या भागातील लोकप्रतिनिधीं उपस्थित रहणार आहेत.
दरम्यान, बुधवारी घाटे यांनी हडपसर आणि नगर रस्ता क्षेत्रीय कार्यालयाच्या बैठका घेतल्या. यावेळी लोक प्रतिनिधीच्या सूचना ऐकून घेत, साथीला अटकाव घालण्यासाठी तातडीनं उओआय योजना करण्याच्या सूचना घाटे यांनी प्रशासनास दिल्या आहेत.
या बाबत बोलताना घाटे म्हणाले की, कोरोना विषाणू प्रादुर्भाव नियंत्रणाकरिता विविध उपाय योजना पुणे महानगरपालिका यशस्वीरीत्या राबवित आहे. मात्र, त्यानंतरही रोज प्राप्त होणारी आकडेवारी कशी कमी करता येईल, पुणे शहर कोरोना मुक्त करण्याच्या दृष्टीने प्रभावी नियोजन सर्व शहरात करण्यात येणार आहे. याबाबत स्थानिक लोकप्रतिनिधींच्या सूचना तसेच त्यांची मदत आवश्यक आहेत. या त्यादृष्टीने क्षेत्रीय कार्यालय परिसरातील संपूर्ण आढावा घेतला जात आहे.
आज हडपसर मुंढवा व नगररस्ता वडगावशेरी क्षेत्रीय कार्यालयात बैठक घेण्यात आली . त्यात यामध्ये आजपर्यंत करण्यात आलेल्या उपाययोजना, मनुष्यबळ, मास्क, सॅनिटायजेर, किट्स, निर्जंतुकीकरण, रेशन वितरण, विलगिकरणाच्या व रुग्णालयातील व्यवस्था, उपाययोजनांच्या दृष्टीने पुढे नियोजनाकरिता दिशा ठरविणे याबाबत सविस्तर आढावा घेण्यात आला आहे. त्यानुसार, प्रशासनास आवश्यक सूचना देण्यात आल्या असून याचा एक अहवाल आयुक्तांनीही देण्यात येणार आहे. त्यामुळे स्थानिकभागात साथ रोखण्यासाठी आवश्यक उपाय योजना करणे शक्य असल्याचे घाटे यांनी स्पष्ट केले.