सांगली जिल्ह्यातील रुग्णांची संख्या ८ वर
सांगली (प्रतिनिधी) – कवठेमहांकाळ तालुक्यातील घोरपडी येथील एकास करोनची लागण झाली. त्यास मिरज रुग्णालयातील आयसोलेशन कक्षात दाखल करण्यात आले आहे. ही व्यक्ती मुंबईतून गावी पोचण्यापूर्वीच तपासणी केल्याने तो पाँझिटिव्ह असल्याचे लक्षात आले. त्यामुळे आता सांगली जिल्ह्यातील करोनाबाधितांची संख्या ८ वर पोहचली आहे.
मुंबई येथील ट्रकवर काम करणारा एक जण ट्रकमधुन इस्लामपूर येथे आला. तेथून तो टँकरमधून कवठेमंकाळ तालुक्यातील घोरपडी या आपल्या गावाकडे निघाला होता . तथापि मुंबई येथून आल्याने सदर व्यक्तीची वैद्यकीय तपासणी चोरोची येथे करण्यात आली. यावेळी या व्यक्तीची लक्षणे करोना संशयित वाटल्याने तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्याला ढालगाव प्राथमिक आरोग्य केंद्राकडे तपासणीसाठी पाठविले. यानंतर त्याला तात्काळ रुग्णवाहिकेद्वारे या व्यक्तीला मिरज येथील आयसोलेशन कक्षात दाखल केले. सोमवारी या व्यक्तीचा स्त्राव घेण्यात आला होता. मंगळवारी रात्री त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आला. करोना बाधितावर मिरज रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत.