रायपुर: छत्तीसगड सरकारने आपल्या राज्यातील ग्रीन झोन मध्ये घरपोच दारू पुरवण्यासाठी एक स्वतंत्र वेबपोर्टलच तयार केले आहे. राज्यातील दारू दुकानांबाहेरील गर्दी टाळण्यासाठी ही उपाययोजना केली जात असल्याचे सरकारने नमूद केले आहे. छत्तीसगड स्टेट मार्केटिंग कार्पोरेशन लिमिटेड या सरकार उपक्रमाने ही सेवा सुरू केली आहे.
23 मार्च पासून राज्यातील दारू दुकाने बंद आहेत. ही दुकाने काल पासून सुरू करण्यास ग्रीन झोन मध्ये अनुमती देण्यात आली आहे पण तेथे प्रचंड गर्दी होत असल्याने या गर्दीला आवर घालण्यासाठी ही ऑन लाईन सेवा सुरू करण्यात आल्याचे एका वरीष्ठ सरकारी अधिकाऱ्याने सांगितले. कोणत्याहीं व्यक्तीला एकावेळी पाच लिटर दारूची ऑर्डर या वेब पोर्टलवरून किंवा मोबाइल ऍपवरून नोंदवता येईल. घरपोच डिलिव्हरी देण्यासाठी 120 रूपये जादा भाडे आकारले जाणार आहे.