नवी दिल्ली : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. केंद्र सरकार आणि राज्य सरकार कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी उपाययोजना करीत आहेत. दरम्यान, कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव पाहता काँग्रेसच्या अंतरिम अध्यक्षा सोनिया गांधी काँगेस शासित राज्याच्या मुख्यामंत्र्यांसोबत चर्चा करणार आहेत.
कांग्रेस की अंतरिम अध्यक्ष सोनिया गांधी #Coronavirus के कारण स्थिति को लेकर कल कांग्रेस शासित राज्यों के मुख्यमंत्रियों के साथ वीडियो कॉन्फ्रेंस के जरिए बैठक करेंगी। (फाइल तस्वीर) pic.twitter.com/nW1LAeF0QO
— ANI_HindiNews (@AHindinews) May 5, 2020
सोनिया गांधी बुधवारी काँगेस शासित राज्याच्यामुख्यमंत्र्यांसोबत व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे चर्चा करण्यात येणार आहे. यापूर्वी सोनिया गांधी यांच्या नेतृत्वात कॉंग्रेस कार्यकारी समितीची बैठक झाली होती, त्यामध्ये सद्यस्थितीवर चर्चा झाली. या बैठकीनंतर कॉंग्रेसने एक समिती स्थापन केली होती. ज्याचे अध्यक्ष माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग होते. कोरोना संकटाचा सामना करण्यासाठी आणि अर्थव्यवस्थेची पुनर्बांधणी करण्यासाठी सरकारला सूचना देण्याचे काम हि समिती करते आहे.
या व्यतिरिक्त सोनिया गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर एक पात्र लिहले आहे. ज्यात अनेक प्रकारचे सरकारी खर्च कमी करण्याची मागणी काँग्रेसच्या वतीने करण्यात येत आहे.