महापालिकेच्या आरोग्य विभागाचे आदेश
पुणे – साथरोगाच्या काळात रुग्णांसाठी शासकीय आणि खासगी रुग्णालयांमधून आवश्यक त्या उपचारात्मक सुविधा उपलब्ध करून देणे आवश्यक आहे. या साथीच्या काळात सध्या शहरातील काही खासगी रुग्णालये, क्लिनिक आणि डिस्पेन्सरी बंद ठेवण्यात येऊन वैद्यकीय सेवा बंद केल्याचे निदर्शनाला येत आहे. त्यामुळे असे केल्यास कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिला आहे.
इतर आजारी व्यक्तींना, नागरिकांना उपचार मिळवण्यासाठी अडचणी निर्माण होत आहेत. मात्र रुग्णालये, क्लिनिक आणि डिस्पेन्सरी यांनी अशा रुग्णांना योग्य ते उपचार मिळतील याची दक्षता घ्यावी. औषधोपचाराअभावी रुग्णाचा मृत्यू अथवा दिरंगाई होणार नाही याबाबत काळजी घ्यावी, असेही आदेशात नमूद केले आहे.