मुंबई – अभिनेता इरफान खान यांच्या निधनानंतर बॉलिवूडच्या चाहत्यांसाठी चिंता वाढवणारी अजून बातमी येऊन धडकली आहे. बॉलिवूडचे जेष्ठ अभिनेते ‘ऋषी कपूर’ यांचे आज निधन झाले आहे. अभिनेते अमिताभ बच्चन यांनी त्यांच्या निधनाच्या वृत्ताला पुष्टी दिली आहे.
T 3517 – He’s GONE .. ! Rishi Kapoor .. gone .. just passed away ..
I am destroyed !— Amitabh Bachchan (@SrBachchan) April 30, 2020
ऋषी कपूर यांची रात्री उशिरा अचानक तब्येत बिघडल्यानं त्यांना तातडीनं रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं. मुंबईतील एचएन रिलायन्स रुग्णालयात ICU मध्ये त्यांच्यावर उपचार सुरू सुरू होते.
ऋषी कपूर यांना 2018 रोजी पहिल्यांदा कर्करोग असल्याचं समोर आलं. त्यानंतर जवळपास 8 महिने न्यूयॉर्कमध्ये त्याच्यावर उपचार करण्यात आले. याआधी ऋषी कपूर किंवा त्यांच्या कुटुंबियांपैकी कोणीही या आजाराबाबत खुलासा केला नव्हता. नंतर त्यांनी स्वत: आपल्या फॅन्सना या आजाराबाबत माहिती दिली होती.