मुंबई – देशासमोर उभ्या असलेल्या करोनाशी लढा देण्यासाठी सरकारला मदत म्हणून उद्योजक, सिनेकलाकार, राजकीय नेते, बॉलीवूड कलाकार पुढे सरसावले आहेत. मात्र काही भारतीय कलाकांनी राहत फतेह अली खानसोबत मंच शेअर केला आहे. त्यामुळे फेडरेशन ऑफ वेस्टर्न इंडिया सिने एम्प्लॉईजने पुन्हा एकदा पाकिस्तानी कलाकारांसोबत काम न करण्यासाठी भारतीय कलाकारांना चेतावणी दिली आहे.
पाकिस्तानी गायक, तंत्रज्ञ, कलाकारांसोबत काम करु नये असं आधीच सांगण्यात आलं आहे. डिजिटल ऑनलाईन कॉन्सर्टमध्ये देखील नाही. FWICEने अतिशय कडक शब्दांमध्ये चेतावणी दिली आहे. शिवाय अधिकृत विधान देखील जारी केलं आहे. असं वक्तव्य तरण आदर्श यांनी ट्विटरवर पोस्ट शेअर करताना केलं आहे.
‘FWICE या पत्रकात भारतीय कलाकारांची नावे नमूद करण्यात आलेली नाहीत. गेल्या वर्षी पाकिस्तानने केलेल्या पुलवामा दहशदवादी हल्ल्यानंतर फेडरेशन ऑफ वेस्टर्न इंडिया सिने एम्प्लॉईजचे अध्यक्ष अशोक पंडित यांनी पाकिस्तानी कलाकारांवर पूर्णपणे बंदी घातली होती.