पत्ते खेळणाऱ्या व्यक्तींना काढायला लावल्या उठाबशा
वाघोली (प्रतिनिधी): लोणीकंद पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रताप मानकर साहेब यांना पिंपरी सांडस गावातील एका महिलेने फोन करून नलगे मळा येथे आंब्याच्या झाडाखाली अनेक पुरुष एकत्र बसून पत्ते खेळत बसतात अशी तक्रार केली असता पोलीस निरीक्षक प्रताप मानकर यांच्या मार्गदर्शनाखाली तात्काळ पोलीस हवालदार बाळासाहेब सकाटे व पोलीस कॉन्स्टेबल ऋषीकेश व्यवहारे यांना सदर ठिकाणी जाऊन खात्री केली त्यावेळी ३ ते ४ जण लोक मिळून आले. त्यांना जागीच बैठका काढण्यास सांगून त्यांचेकडून असे कृत्य पुन्हा होणार नाही असे वदवून घेतले व पोलिसांनी या लोकांना गुलाबपुष्प देऊन गांधीगिरी केली .
कोरोना विषाणूचा संसर्ग होवू नये म्हणून मा. जिल्हाधिकारी यांनी संचारबंदी व जमावबंदी चे आदेश लागू केले आहेत. तसेच कोणीही व्यक्ती सार्वजनिक ठिकाणी विनाकारण तोंडाला मास्क न लावता तसेच विनाकारण दुचाकी वरून फिरताना आढळल्यास त्याचेवर राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन कायदा व भा दं वि कलम 188 प्रमाणे गुन्हा दाखल करून दुचाकी जप्त करण्यात येणार येत असून नागरिकांनी विनाकारण बाहेर फिरू नये असे आवाहन लोणीकंद पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक प्रताप मानकर यांनी केले आहे.