पुणे – करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य सरकारने सार्वजनिक वाहतुकीवर बंदी घातली आहे. मात्र अत्यावश्यक सेवेमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची गैरसोय होऊ नये म्हणून पीएमपीएलची सेवा सध्या सुरू आहे. कर्मचाऱ्यांच्या सुरक्षितेसाठी बसमध्ये सोडियम हायप्रोक्लोराईड निर्जंतुकीकरण फवारणी सुरु करण्यात आली आहे.
पीएमपीच्या व्यवस्थापकीय संचालक नयना गुंडे यांनी ही संकल्पना राबवली आहे. विशेष म्हणजे यासाठी बसेसमध्ये कोणताही बदल केलेला नसून अतिरिक्त खर्चही करण्यात आलेला नाही. सदरचे काम कोथरूड वर्कशॉपमधील कर्मचारी पायगुडे, मारणे, जाधव, हगवणे, भोसले दुपटे यांनी केले आहे.