“गल्ली बॉय’मध्ये अभिनेता रणवीर सिंह एका वेगळ्या स्टाईलमध्ये दिसला होता. तसेच हा चित्रपट त्या चित्रपटांपैकी आहे, ज्याचा मला कायम अभिमान वाटेल, असेही रणवीर सिंह म्हणाला होता. या चित्रपटाचे दिग्दर्शन बॉलीवूडमध्ये वेगळा चित्रपट करण्यासाठी प्रसिद्ध असलेल्या झोया अख्तर यांनी केले होते.
आता झोयाच्या आगामी चित्रपटाची स्क्रिप्ट तयार असल्याचे वृत्त आहे आणि या चित्रपटात रणवीर सिंहला ती कास्ट करणार आहे. सूत्रांचे म्हणणे आहे की, झोयाला रणवीरबद्दल खूप आदर आहे आणि तो स्क्रिप्ट ऐकल्याशिवायही चित्रपट साइन करू शकतो, असे झोयाला वाटते.
दरम्यान, या चित्रपटासाठी रणवीरने झोयाला होकार दर्शविला असल्याचे समजते. या चित्रपटाचा विषय काय आहे? कथा काय आहे? हे अद्याप स्पष्ट झालेली नाही. पण या चित्रपटाला फरहान अख्तर आणि रितेश सिधवानी प्रोड्यूसर करणार असल्याची माहिती आहे. जर रणवीरने हा चित्रपट केल्यास तो झोयाबरोबरचा तिसरा चित्रपट असेल. यापूर्वीही त्यांनी “दिल धडकने दो’ आणि “गली बॉय’ या दोन चित्रपटांमध्ये काम केलेल आहे.