सातारा : मॉर्निंग वॉक करणार्यावर कारवाईचा बडगा उगारला असतानाच पोलिसांनी आता इव्हिनिंग वॉक करणार्यावरही कारवाईचा धडाका सुरू केला आहे. शनिवारी सायंकाळी गोडोली, स्वराज्यनगर, इंदिरानगर, चारभिंती, विलासपूर, साईबाबा मंदिर, पॅरेंट स्कूल परिसरात इव्हिनिंग वॉक करणार्या 29 जणांवर शहर पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहेत.
सातारा शहर पोलिसांचे एक पथक शनिवारी सायंकाळी हद्दीत पेट्रोलिंग करत असताना पोलिसांना वरील ठिकाणी काहीजण इव्हिनिंग वॉक करत असल्याचे दिसले. त्यानंतर पोलिसांनी तत्काळ तेथे धाव घेऊन संबंधितांना ताब्यात घेतले. त्यानंतर संबंधितांवर जिल्हाधिकार्यांच्या आदेशाचा भंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु होते.