बेल्हे (वार्ताहर) : पेमदरा (ता.जुन्नर) येथील गावात ग्रामपंचायतीच्या वतीने संपुर्ण गावात कीटकनाशकाची फवारणी करण्यात आली. या गावचे सरपंच रंगनाथ बेलकर यांनी स्वतः पुढाकार घेऊन गावामध्ये कीटकनाशकाची फवारणी केली.
गावातील सर्व रस्ते, नागरिकांच्या घराचे अंगण, शाळा परिसर, मंदिर परिसर, ग्रामपंचायत परिसर तसेच गावची सर्व महत्त्वाच्या ठिकाणी ग्रामपंचायतीच्या वतीने औषधाची फवारणी करण्यात आली.
ग्रामपंचायतीच्या वतीने सर्व नागरिकांना करोना बाबत ची जनजागृती करण्यात आली. नागरिकांनी अत्यावश्यक कामाव्यतिरिक्त गावातून बाहेर पडू नये अशा सूचना ग्रामपंचायतीने नागरिकांना दिल्या आहेत.
बाहेर गावातून येणाऱ्या नागरिकांची ग्रामपंचायतीच्या वतीने व आरोग्य विभागाकडून कसून तपासणी करण्यात येते. यावेळी गावचे सरपंच रंगनाथ बेलकर, ग्रामसेवक, पोलीस पाटील,ग्रामपंचायत सदस्य आदी उपस्थित होते.