मुंबई – अवघ्या जगाला वेठीस धरणाऱ्या करोना व्हायरसला थोपवण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज देशात जनता कर्फ्यु पाळण्याचे आवाहन केले आहे. त्याला जनतेकडून उत्स्फूर्त प्रतिसाद देखील मिळत आहे. भारतातही या व्हायरसचे 300 पेक्षा जास्त रुग्ण आढळून आले आहेत. या व्हायरसवर कोणत्याही प्रकारचं औषध नाही. त्यामुळे त्यापासून वाचण्यासाठी गर्दीपासून लांब राहणं, स्वतःची स्वच्छता राखणं, अशा सर्व गोष्टी करणं गरजेचं आहे. अशा अनेक बॉलिवूड सेलिब्रेटी कोरोनापासून वाचण्यासाठी शक्य ते उपाय करण्याचं आणि स्वतःची काळजी घेण्याची विनंती करताना दिसत आहेत. अशात सध्या सलमान खानचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे. या व्हिडीओमध्ये भाईजान सर्वांवर नाराज असलेला पाहायला मिळत आहे.
#IndiaFightsCorona @CMOMaharashtra @mybmc @AUThackeray @Iamrahulkanal pic.twitter.com/l9qPAPs88U
— Salman Khan (@BeingSalmanKhan) March 21, 2020
सलमान खाननं त्याच्या सोशल मीडियावर अकाउंटवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यात तो सर्वांवर रागावलेला दिसत आहे. याचं कारण आहे सध्या देशात कोरोनानं थैमान घातलेलं असताना लोकांचा निष्काळजीपणा. सलमाननं त्याच्या या व्हिडीओमधून लोकांना त्यांच्या सुरक्षेकडे गंभीरतेनं पाहण्याचा सल्ला दिला आहे.