नवी दिल्ली – करोना व्हायरसमुळे स्पेनमधील एका युवा फुटबॉल प्रशिक्षकाचा मृत्यू झाला. क्रीडा क्षेत्रातील हा पहिलाच बळी ठरला आहे. करोनामुळे मृत पावलेला गार्सिया हा मलागा येथील पाचवा व्यक्ती आहे. करोनामुळे मृत पावलेल्यांमध्ये गार्सिया हा सर्वात युवा होता. अन्य मृत व्यक्ती ७० ते ८० वर्षांचे होते. करोना विषांणूचा प्रसार झाल्यानंतर स्पेनमध्ये अद्यापपर्यत 300 नागरिकांचा मृत्यू झाला आहे.
दरम्यान, मलागा येथील अॅथलिटको पोर्टाडा क्लबचा प्रशिक्षक फ्रासिस्को गार्सिया याला करोना व्हायरसची लागण झाली होती आणि उपचारा दरम्यान त्याचा मृत्यू झाला. फ्रासिस्कोचे वय फक्त २१ वर्ष होते. फ्रासिस्को कॅन्सरवर देखील उपचार करत होता. त्यामुळे त्याची रोगप्रतिकारक शक्ती कमी होती. याच काळात त्याला करोनाची लागण झाली आणि अखेर त्याला आपल्या जीवाला मुकावे लागले.
?? R.I.P Francisco Garcia from Malaga.
Francisco was a 21 year old football coach in Spain, He was diagnosed with Coronavirus and at the same time found he had cancer. Thoughts are with his family during this difficult time. pic.twitter.com/NE1wehGjoo
— FutbolBible (@FutbolBible) March 16, 2020
प्रशिक्षकाच्या मृत्यूवर क्लबने दु:ख व्यक्त केले आहे. गार्सियाच्या मृत्यूमुळे आम्ही खूप दु:खी आहोत. आम्ही तुला कधी विसरू शकत नाही. तू या जगात नाहीस यांची खंत नेहमीच जाणवणार, असे त्यांनी म्हटले आहे.