मुंबई – होळीचा सण म्हणजे आनंद आणि विविध रंगाची उधळण. त्यामुळे होळीचा हा सण सर्वांसाठीच अतिशय महत्त्वाचा असतो. दरम्यान, यावेळी पुरणपोळी, थंडाई यामुळे या सणात खाण्यापिण्याचीही मस्त चंगळ असते.
होळीसाठी मित्रमंडळी, नातेवाईकमंडळी एकत्र येऊन तुफान धमाल करतात.मग कलाकार मंडळी आणि कलाविश्वही त्यापासून दूर राहात नाही. सर्वच कलाकार मंडळी यावेळी रंगात अक्षरश: नाहून निघतात. या सणाच्या निमित्याने बॉलिवूड कलाकारही सोशल मीडियाद्वारे फॅन्सला शुभेच्छा देत आहे.
धर्मेंद्र यांनी ट्विट केले की,’सर्व फॅन्सला होळीच्या खूप साऱ्या शुभेच्छा ! या सणाला साजरा करा मात्र, काळजी पूर्वक कोरोना, कोरोना आणि कोरोना.’ या ट्विट करत त्यांनी शोले चित्रपटातील हेमा मालिनी आणि त्यांचा फोटो शेअर केला आहे. दरम्यान, बॉलिवूड सेलेब्सपैकी शत्रुघ्न सिन्हा, अक्षय कुमार आणि ऋषि कपूर यांनी ट्विट करत होळीच्या शुभेच्छासह कोरोनाबाबत काळजी घेण्याच्या संदेश दिला आहे.
धर्मेंद्र यांचे ट्विट
HAPPY HOLI, Friends celebrate it? but very carefully. crona , CRONA and crona? pic.twitter.com/usliECFOBw
— Dharmendra Deol (@aapkadharam) March 10, 2020
अक्षय कुमार यांचे ट्विट
Happy Holi everyone! Play safe, stay safe. https://t.co/5TtSI2slKb
— Akshay Kumar (@akshaykumar) March 10, 2020
ऋषि कपूर यांचे ट्विट
A young Brat wishes a safe and a happy Holi to all. Be careful of the Carona Virus. pic.twitter.com/2jEqbHJWob
— Rishi Kapoor (@chintskap) March 9, 2020
शत्रुघ्न सिन्हा यांचे ट्विट
May the warm & bright colours ?of Holi, the festival of colours ?fill our lives with joy, love, happiness, positivity & peace. May we all embrace brotherhood, unity & shun negativity & hatred & live & let live. Happy Holi!!? pic.twitter.com/IKl4BYK736
— Shatrughan Sinha (@ShatruganSinha) March 10, 2020