सातारा : तहसीलदार आशा होळकर यांच्याकडे शुक्रवारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून चौकशी झाली. अद्याप चौकशी पूर्ण झालेली नसून चौकशीसाठी त्यांना पुन्हा बोलवले जाणार आहे, अशी माहिती पोलीस निरीक्षक अविनाश जगताप यांनी दिली.
दरम्यान, लाचप्रकरणी लिपिक रमाकांत फडतरे याला न्यायालयात शुक्रवारी हजर केले असता न्यायालयाने त्याला जामीन मंजूर केला. परंतु एसीबीत हजेरी लावण्याचे आदेशही न्यायालयाने दिले आहेत. लिपिक फडतरे याच्या लाच प्रकरणावरुन तहसीलदार आशा होळकर यांना चौकशीसाठी बोलावण्यात आले होते. एसीबी विभागाने सुमारे ३ तास त्यांच्याकडे चौकशी केली.
She was rude and very arrogant while as Tahsildar in Good grains Supply department in Pune, say Revenue Office kale in pune Collectorate. I can vouch this behaviour of her and had even complained to her immediate boss the deputy Collector