सातारा – रहिमतपूर पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यात मदत करण्यासाठी बारा हजार रुपयांची लाच मागणाऱ्या पोलीस नाईक कणसे (पूर्ण नाव माहीत नाही) याच्यावर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून काल (दि. 13) रहिमतपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कणसेला न्यायालयाने एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे.
याबाबत माहिती अशी, तक्रारदाराविरोधात रहिमतपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. त्या गुन्ह्यात मदत करून प्रतिबंधात्मक कारवाई न करण्यासाठी कणसे याने बारा हजार रुपयांची मागणी केली होती.
याबाबत तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या सातारा कार्यालयाकडे जानेवारी महिन्यात तक्रार केली होती. एसीबीच्या अधिकाऱ्यांनी लाच मागणीची पडताळणी करण्यासाठी दि. 8 जानेवारी रोजी रहिमतपूर पोलीस ठाण्याच्या आवारात सापळा लावला होता. त्यावेळी कणसे हा लाच मागत असल्याचे स्पष्ट झाले होते.