नातेपुते -नातेपुते (ता. माऴशिरस) येथील शालेय कराटे अँड किक बॉक्सिंग ऍकॅडमी महाराष्ट्र राज्य या संस्थेच्या वतीने सोलापूर वडाळा येथे कराटे कलर बेल्ट परीक्षा घेण्यात आली. या कराटे येलो बेल्ट परीक्षेमध्ये सुजित बरडकर, दिशा बोराटे, सई पवार, अथर्व मैड, ऑरेंज बेल्टमध्ये तेजल ठेंगल, अर्पित व्होरा, श्रुति आतार, प्रजित बरडकर, श्रेया पवार, तन्मय बरडकर, सार्थक पद्मन, तनवी बरडकर, ग्रीन बेल्टमध्ये अर्चित कवितके, दिग्विजय दडस, जान्हवी सोनवळ, पर्पल बेल्टमध्ये धनश्री लाळगे यांनी यश संपादन केले.
यशस्वी विद्यार्थ्यांना महाराष्ट्र कमांडो फाऊंडेशनचे अध्यक्ष मनोज राऊत, माळशिरस तालुका स्वयंसिद्धा कराटे प्रशिक्षिका सविता राऊत, ब्लॅक बेल्ट तेजस्विनी शिरतोडे, भक्ती परचंडे, पूजा कर्चे यांच्या हस्ते प्रमाणपत्र देण्यात आले. यावेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत असताना मनोज म्हणाले की, कोणतीही गोष्ट अशक्य नसते जिद्द चिकाटी व मनाची एकाग्रता या जोरावर अशक्य गोष्ट शक्य करू शकतो.
कराटे खेळात सरावाची सातत्य महत्त्वाचे असते, त्यामुळे तुमच्या सरावात वाढ होईल आणि पुढे होणाऱ्या कराटे फाईट स्पर्धेसाठी त्याचा तुम्हाला फायदा होईल, असे मत महाराष्ट्र कमांडो फाउंडेशनचे अध्यक्ष मनोज राऊत यांनी व्यक्त केले, तसेच यशस्वी विद्यार्थ्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.