मलिना (फिलिपिन्स) : भारतीय संघाने आशिया सांघिक बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धेत उपांत्यपूर्व फेरीत थायलंडचा ३-२ असा पराभव केला. या विजयासह भारतीय संघाने उपांत्य फेरीत प्रवेश निश्चित केला आहे. आता भारताची उपांत्य फेरीत इंडोनेशियाविरूध्द लढत होईल. भारताने सलामीच्या लढतीत कझाकस्तानवर विजय मिळविला होता तर दुस-या लढतीत भारताला मलेशियाकडून पराभूत व्हावे लागले होते.
उपांत्यपूर्व फेरीच्या लढतीत किंदाबी श्रीकांत आणि बी साई प्रणीत यांना पहिल्या दोन एकेरी लढतीत पराभव स्विकारावा लागला. पण, त्यानंतरच्या तीन लढतीत भारताने विजय मिळविले.
Incredible comeback!
🇮🇳 shuttlers ensure a place in the semis of @Badminton_Asia with a thrilling3⃣:2⃣victory over 🇹🇭SAI:14-21;21-14;21-12
Srikant:20-22;14-21
MRArjun/Dhruv:21-18;22-20
Lakshya:21-19;21-18
Srikanth/Chirag:21-15;16-21;21-15#BATC2020 #IndiaontheRise#Badminton pic.twitter.com/DNpVKTzGDB— BAI Media (@BAI_Media) February 14, 2020
प्रणीतला कंटाफोन वांगचारोएन याने १४-२१,२१-१४,१२-२१ तर श्रींकातला कुनलावुत वितीदसार्न याने २०-२२, १४ २१ असे पराभूत केले.
एमआर अर्जुन आणि ध्रुव कपिला यांनी किटिनुपोंग केद्रेन आणि तानुपात विरियांगकुरा यांना २१-१८, २२-२० असे तर लक्ष्य सेनने सुपान्यु अविहिंगसानोनला २१-१९, २१-१८ असे पराभूत करत विजय मिळविला.
चिराग शेट्टी आणि श्रींकात या जोडीने मानीपोंग जोंगिट आणि निपिटफोन फुआंगफुआपेट यांचा २१-१५, १६-२१, २१-१५ असा पराभव करत भारताला विजय मिळवून दिला.