लखनौ – अलिगड मुस्लिम विद्यापीठात सीएए कायद्याच्या विरोधात भाषण दिल्याबद्दल अटक करण्यात आलेले डॉ काफील खान यांच्या विरोधात उत्तरप्रदेश सरकारने एनएसए म्हणजेच राष्ट्रीय सुरक्षा कायद्याखाली कारवाई केली आहे. राज्याचे वरीष्ठ पोलिस अधिक्षक आकाश कुल्हारी यांनी ही माहिती दिली आहे. त्यांनी सांगितले की आता त्यांच्यावर रासुका खाली कारवाई करण्यात आल्यामुळे त्यांना आता कारागृहातच राहावे लागेल.
काफील खान यांना सध्या मथुरा कारागृहात ठेवण्यात आले आहे. त्यांना जामीन मिळाला आहे पण त्यांच्यावर रासुका लावण्यात आल्याने त्यांना जामीन मिळूनही कारागृहातच राहावे लागेल. काफील खान हे बीआरडी वेैद्यकीय महाविद्याल गोरखपुर येथे सेवेत होते. पण तेथे 60 बालकांचा मृत्यू झाल्यामुळे त्यांना सेवेतून निलंबीत करण्यात आले आहे.