पुणे- जी.एच रायसोनी अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालयात झालेल्या टेकनो वेव ही स्पर्धा ७ फेब्रुवारी २०२० रोजी पार पडली. या स्पर्धेत कुसरो वाडिया महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी उत्कॄष्ट यश मिळवले.
अणुविद्युत विभागाच्या हॄषिकेश भावसकर, हर्षल कोळसे, धॄव पाटील आणि ऐश्वर्या कांबळे यांनी लाईन फॉलोवर रेस या स्पर्धेत द्वितीय क्रमांक मिळवला. त्यांना विभाग प्रमुख ए.एस.चांडक, प्राध्यापक पी. एस. साने यांचे मार्गदर्शन लाभले. प्राचार्य व्ही.आर.राव यांनी सर्व सहभागी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. या यशाबद्दल त्यांचे महाविद्यालयात सर्वत्र कौतुक होत आहे.
– श्रेया अंबेटी,
कॉलेज रिपोर्टर,
कुसरो वाडिया इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी