“सियारा’ वादळाचा युरोपला धोका

बर्लिन : “सियारा’ हे वादळ सोमवारी ब्रिटनच्या दिशेने सरकले आहे. या वादळामुळे जोरदार वारे वाहू लागले आहेत. तसेच वादळामुळे मुसळधार पाऊसही सुरू झाला आहे. यामुळे पूरांचा धोका निर्माण झाला आहे.

दक्षिण-पश्‍चिम झेक प्रजासत्ताकातील एका कारवर झाड कोसळल्यामुळे चालकाचा मृत्यू झाला आहे. स्लोवेनियाच्या उत्तरेच्या भागातही अशीच दुर्घटना घडली. तर स्वीडनमध्ये, रविवारी रात्री उशिरा एक बोट बुडाल्याने एका व्यक्तीला जलसमाधी मिळाली. हा नंतर किनाऱ्यावर वहात आला, पण त्याचा मृत्यू झाला होता. या बोटीतला आणखी एकजण अजूनही बेपत्ता आहे.

“सियारा’ वादळामुळे ब्रितनमधील सुमारे 20 हजार घरांमधील वीजपुरवठा खंडीत झाला आहे. देशाच्या निम्म्या भागात बोचरे वारे वाहत आहेत, तर काही भागात बर्फवृष्टीही होत आहे. वादळ दूर होत आहे, याचा अर्थ शांत हवामान होत आहे, असा नसल्याचे, मेट्रो ऑफिसचे हवामानशास्त्रज्ञ ऍलेक्‍स बुर्किल म्हणाले. गेल्या 24 तासांमध्ये झालेल्या पावसामुले नद्यांना पूर येण्याचा धोका निर्माण झाला आहे. देशभरात 180 ठिकाणी पूराचे इशारे देण्यात आले आहेत. उत्तर-पश्‍चिम इंग्लंडमधील रहिवाशांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले आहे.

इंग्लंडच्या सीमेवरील हॉटिक या स्कॉटिश शहराला रविवारी तेव्हियट नदीच्या पूराचा तडाखा बसला. मात्र यामध्ये कोणीही जखमी झाले नाही. ब्रिटनची सार्वजनिक वाहतुक, जलवाहतुक आणि रस्तेवाहतुक विस्कळीत झाले आहे. जर्मनीमध्येही 50 हजार घरांचा वीजपुरवठा खंडीत झाला आहे. येथे ताशी 140 किलोमीटर वेगाने वारे वाहत आहेत. फ्रान्सच्या बहुतांश भागालाही नारिंगी रंगाचा धोक्‍याचा इशारा देण्यात आला आहे.

 

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.