नवी दिल्ली : निवडणूक आयोगाने बुधवारी भाजप प्रवक्ते संबित पात्रा यांना नोटीस पाठविली. टीव्ही चॅनेलवर भडकाऊ वक्तव्य केल्याबद्दल त्यांना हि नोटीस देण्यात आली आहे. गुरुवारी संध्याकाळी पाच वाजता केलेल्या वक्तव्याबद्दल उत्तर देण्यास सांगण्यात आले आहे. एका टीव्ही कार्यक्रमात विशिष्ट समूहाबद्दल आक्षेपार्ह भाष्य केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. याप्रकरणी कॉंग्रेसने निवडणूक आयोगाकडे तक्रार केल्यानंतर त्यांना ही नोटीस बजावण्यात आली आहे.
मुख्य निवडणूक आयोगाने दिल्ली निवडणूक आयोग कार्यालयाला पात्रा यांच्या वक्तव्याची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. एका टीव्ही कार्यक्रमात, भाजपा प्रवक्ता संबित पात्रा आणि कॉंग्रेस नेते रागिनी नायक यांच्यात जोरदार वादविवाद झाला होता.
यावेळी संबित पात्रा म्हणाले “आम्ही तुम्हाला घरात घुसून मारू, तुम्ही सुधारले नाही तर काय होईल याचा विचार सुद्धा तुम्ही करू शकत नाही. असा सज्जड दम त्यांनी रागिनी नायक याना दिला होता. त्यावरून त्यांना हि नोटीस बजावण्यात आली आहे.