आढळराव पाटलांची परिवहन मंत्र्यांकडे मागणी
मंचर- मंचर-तांबडेमळा (ता. आंबेगाव) येथे उभारण्यात आलेल्या एस. टी. आगार (डेपोसाठी) कर्मचाऱ्यांच्या नेमणुका करून या डेपोचे लवकरात लवकर लोकार्पण करण्यात यावे. परिवहन सेवा गतिमान करून प्रवासी आणि नागरिकांना दर्जेदार सेवा मिळावी, अशी मागणी शिवसेनेचे उपनेते शिवाजीराव आढळराव पाटील यांनी परिवहन मंत्री अनिल परब यांच्याकडे मुंबई येथे केली.
माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी मागणी केल्याप्रमाणे यव एस. टी. डेपोसाठी कर्मचाऱ्यांच्या नेमणुका करत डेपोचे लवकरात लवकर लोकार्पण करुरून पुणे जिल्ह्यातील ग्रामीण भागात प्रवासी आणि नागरिकांना जलद व दर्जेदार सेवा परिवहन महामंडळाच्या वतीने देण्यात येतील, तसेच परिवहन मंत्री अनिल परब यांनी तात्काळ संबंधित प्रशासकीय यंत्रणेला आवश्यक ती प्रक्रिया पूर्ण करून कार्यवाही करण्याबाबतच्या स्पष्ट सूचना देऊन हा प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन दिले. यावेळी माजी आमदार सुरेश गोरे, जिल्हा परिषद गटनेते देविदास दरेकर, मंचरचे सरपंच दत्ता गांजाळे व ग्रामस्थांचे शिष्टमंडळ उपस्थित होते.