बाळासाहेबांचे स्वप्नं जामिनीवर येऊन पूर्ण करा; अमृता फडणवीसांचा मुख्यमंत्र्यांना टोला

मुंबई: महिलांवर होणाऱ्या अत्याचारांच्या घटनांमध्ये वाढ झाली असून संपूर्ण महाराष्ट्र हादरून गेला आहे. वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट येथील प्रकरणानंतर औरंगाबाद येथील सिल्लोड तालुक्यात महिलेला जिवंत जाळण्याचा गंभीर प्रकार घडला. त्यामध्ये सदर महिलेचा मृत्यू झाला आहे. दरम्यान यावर माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली असून मुख्यमंत्र्यांना लक्ष केले आहे.

अमृता फडणवीस म्हणाल्या,“महाराष्ट्रात गेल्या 2 महिन्यात 4 अॅसिड अटॅकच्या दुदैवी घटना घडल्या आहेत. वर्धा  जिल्ह्यातील हिंगणघाटमध्ये पेट्रोल टाकून प्राध्यापिकेला जिवंत जाळण्याचा प्रयत्न आणि औरंगाबादमधील बलात्काराचे प्रकरण या दोन्ही घटना ऐकून त्रास होतो. आपल्यातील भांडणे विसरुन-सुरक्षिततेविषयी कठोर निर्णय घेणे आवश्यक आहे”

देवेंद्र फडणवीस सरकारच्या ‘मनोधैर्य’ ह्या ‘acid attack victors’ सठी असलेल्या योजनेतील सवलती अंकिता ला देण्यात याव्या अणि महिला आयोग अध्यक्षाचे पद लवकर भारण्यात यावे- माननीय हिंदू हृदयसम्राट बाळासाहेबांचे खरे स्वप्नं आता जामिनीवर येऊन पूर्ण करा, असा टोला देखील त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लगावला.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.