महाविकास आघाडीचे दुष्यंत चतुर्वेदी विजयी
मुंबई : यवतमाळ विधान परिषद पोटनिवडणुकीत भाजपला धक्का बसला आहे. या निवडणुकीत महाविकास आघाडीचा विजय झाला आहे. महाविकास आघाडीचे उमेदवार दुष्यंत चतुर्वेदी विजयी झाले आहेत. दुष्यंत चतुर्वेदी यांनी भाजपचे उमेदवार सुमीत बाजोरिया यांचा पराभव केला. दुष्यंत चतुर्वेदी यांना 298 तर भाजपच्या सुमीत बाजोरिया यांना 187 मते मिळाली.
यवतमाळ विधान परिषदेसाठी 31 जानेवारी रोजी मतदान झाले होते. आज सकाळी 8 वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात झाली. महाविकास आघाडीचे उमेदवार दुष्यंत चतुर्वेदी हे पहिल्यापासून आघाडीवरच होते. या निवडणुकीत दुष्यंत चतुर्वेदी सुमीत बाजोरियांचा पराभव करत 113 मतांनी विजयी झाले.
दरम्यान, यवतमाळ विधान परिषदमधून आमदार तानाजी सावंत निवडून आले होते. मात्र ते विधानसभेवर निवडून गेल्याने ही जागा रिक्त झाली होती. त्यामुळे या जागेवर पोटनिवडणूक घेण्यात आली होती. दरम्यान, दुष्यंत चतुर्वेदींनी 23 जून 2019 रोजी शिवसेनेत प्रवेश केला होता.