पुणे – शहरात गुन्हेगारांची ‘दशहत’ कायम असून, सहकारनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत मध्यरात्री टोळक्यांनी तुफान राडा घालत ‘खळखट्याक’ करत रस्त्यावर पार्किंग केलेल्या सर्वसामान्य नागरिकांच्या दुचाकी, तीन चाकी आणि चारचाकी वाहनांची राख रांगोळी केली आहे.
यामुळे या परिसरात रात्रीपासून तणावपूर्ण वातावरण तयार झाले आहे. 41 वाहनांची तोडफोड करण्यात आली आहे. याप्रकरणी सहकारनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे.