नवी दिल्ली : देशात एकीकडे केंद्र सरकारच्या सुधारित नागरिकत्व कायद्याच्या विरोधात आंदोलने आणि निदर्शने होत आहेत. तर दुसरीकडे कायद्याच्या समर्थनार्थ रॅली निघत आहेत.याच पार्श्वभूमीवरसीएएविरोधी आंदोलनांना आता अभिनेत्री पूजा भटनं आपला पाठिंबा दर्शवला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, एकाप्रेस कॉन्फरन्समध्ये बोलताना पूजानं नागरिकत्व सुधारणा कायद्याला आपला विरोध असल्याचं स्पष्ट केलं.
Pooja Bhatt in Mumbai y’day: I implore our leaders to listen to the voices that have risen in the country. The women in India,at Shaheen Bagh&Lucknow…we’ll not stop until we are heard loud&clear.I’d implore people to speak up more. I don’t support CAA&NRC as it divides my house pic.twitter.com/Hm3TlJ3AdT
— ANI (@ANI) January 28, 2020
दरम्यान, दक्षिण मुंबईतीलच्या विरोधआत सुरू असलेल्या आंदोलनाच्या एका कार्यक्रमात पूजा भट आणि अनेकांनी सहभाग नोंदवला. यावेळी बोलताना पूजा म्हणाली,’बॉलिवूडमध्ये फक्त काही लोकच बोलतात. मला माहित आहेत सर्वजण बोलत नाहीत. सगळे घाबरतात. शाहीन बाग ते लखनऊ पर्यंत आंदोलन करणाऱ्या महिलांचं बोलणं ऐका. या सरकारला माहित आहे की त्यांचे ऑडियन्स कोण आहेत. सोशल मीडियावरील लोकांना माझी विनंती आहे, घरात आग लागलीच आहे. त्यात आणखी पेट्रोल ओतू नका. जे विद्यार्थी याच्या विरोधात प्रदर्शन करत आहेत त्यावरुन आपल्याला हे समजतं की आता आवाज उठवण्याची वेळ आली आहे.’ असं म्हणत तिने सरकारवर निशाणा साधला आहे.