नवी दिल्ली : कोरोना विषाणूंची भाधा झाल्याच्या संशयावरून नवी दिल्लीतील राम मनोहर लोहिया रुग्णालयात तीन जणांना विलगता कक्षात (आयसोलेशन वॉर्ड) ठेवण्यात आले, असे सरकारी अधिकाऱ्यांनी सांगितले.
हेसर्व संशयित बाधीत 24 ते 48 वर्षाच्या वयोगटातील आहेत. त्याच्या रक्ताचे आणि बडक्याचे नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत.
यातीन पैकी दोघे जण दिल्लीचे रहिवासी आहेत. सोमवारपर्यंत 155 विमान फेऱ्यांतून चीनमधून आलेल्या 33 हजार 552 जणांची तपासणी करण्यात आली.