अनंतनाग (काश्मिर) : काश्मिरच्या अनंतनाग जिल्ह्यात दहशतवाद्यांची सुरक्षा दलाशी सोमवारी दुपारी चकमक उडाली. सुरक्षा दलाने दोन दहशतवाद्यांना घेरले असल्याचे सूत्रांनी सांगितले.
अनंतनाग जिल्ह्यातील मकदपोरा गावात दहशतवादी लपल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर त्यांनी सुरक्षा दलाच्या सहाय्याने या भागाची नाकाबंदी केली. त्यांनी शोधमोहीम सुरू केली.
दहशतवाद्यांना आपण घेरले गेल्याचे लक्षात येताच त्यांनी गोळीबार सुरू केला. त्याला सुरक्षा दलांनी जोरदार प्रत्यूत्तर देण्यास सुरवात केली आहे. या कारवाईत दोन दहशतवादी घेरले गेल्याची प्राथमिक माहिती हाती येत आहे.
(ही सुरू असणारी चकमक आहे. अधिक तपशीलाच्या प्रतिक्षेत आहोत.)