बँकाॅक : स्पेनची बॅडमिंटनपटू कॅरोलिना मरीनला थायलंड मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धेतील महिला एकेरीच्या उपांत्य फेरीत पराभव पत्करावा लागला आहे. त्यामुळे तिचे स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले.
https://twitter.com/Radioestadio/status/1221020090046537729?s=19
स्पर्धेतील उपांत्य फेरीच्या सामन्यात जपानच्या अव्वल मानांकित अकेन यामागुचीने कॅरोलिनाचा १४-२१, २३-२१, २१-१८ असा पराभव केला. अकेनचा अंतिम फेरीत आता कोरियाच्या अॅन सि यंगशी सामना होईल.
दुस-या उपांत्य फेरीच्या सामन्यात अॅन सि यंगने जपानच्या अया ओहोरीचा २१-१७, २१-१४ असा पराभव करत अंतिम फेरीत धडक मारली आहे.