गोलंदाज अनुष्का 

बॉलीवूडमध्ये सध्या बायोपिक तयार करण्याची लाट इतकी मोठ्या प्रमाणावर आणि वेगाने आली आहे की दर आठवड्याला एखाद्या नव्या बायोपिकची चर्चा सुरू होते. यामध्ये सर्वाधिक बायोपिक क्रिकेट विश्‍वातील खेळाडूंवर बनवले जात आहेत. या मालिकेमध्ये आता आणखी एकाची भर पडली आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by AnushkaSharma1588 (@anushkasharma) on


भारताची गोलंदाज झूलन गोस्वामी हिच्या आयुष्यावर आधारित बायोपिक लवकरच रूपेरी पडद्यावर येणार आहे. या चित्रपटात झूलनची व्यक्‍तिरेखा अनुष्का शर्मा साकारणार आहे. यानिमित्ताने अनुष्का जवळपास दोन वर्षांनी रूपेरी पडद्यावर दिसणार आहे. यापूर्वी 2018 मध्ये ती “झिरो’ चित्रपटात दिसली होती. त्यानंतर तिने चित्रपटातून ब्रेक घेतला होता.

 

View this post on Instagram

 

A post shared by AnushkaSharma1588 (@anushkasharma) on


आता ती परतत आहे. पण केवळ वेळ घालवण्यासाठी तिला चित्रपट करायचे नाहीयेत म्हणे ! “परी’, “झिरो’ आणि “सुई धागा’ या चित्रपटांनंतर मला आरामाची गरज होती, त्यामुळेच मी2019 मध्ये विश्रांती घेतली , असं अनुष्का सांगते. विराटसोबतच्या संसारात रमलेल्या अनुष्काला आता झूलनच्या व्यक्‍तिरेखेसाठी पतीकडून अनेक गोष्टी शिकून घेता येतील !

Leave A Reply

Your email address will not be published.