मुंबई – महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं पहिलं महाअधिवेशन आज मुंबईतील गोरेगाव परिसरात असलेल्या नेस्को संकुलात आयोजित करण्यात आलं आहे. यावेळी ढोल ताशांच्या गजरात मनसेच्या नव्या झेंड्याचं अनावरण करण्यात आलं आहे. पूर्णपणे भगव्या रंगाच्या या ध्वजावर शिवाजी महाराजांची राजमुद्रा आहे. “प्रतिपच्चंद्रलेखेव वर्धिष्णुर्विश्ववंदिता, शाहसुनोः शिवस्यैषा मुद्रा भद्राय राजते” हे शब्द या राजमुद्रेवर आहेत.
दरम्यान, यावेळी मराठी चित्रपटसृष्टी अभिनेते संजय नार्वेकर यांनी भाषण केलं. भाषणाची सुरुवात करताना त्यांनी राज ठाकरे यांचं कौतुक करत त्यांचा ‘जाणता राजा’ असा उल्लेख केला. त्यानंतर नार्वेकर यांनी लागलीच स्पष्टीकरण दिले. “राज ठाकरे यांचे नाव राज असल्याने त्यांचा ‘जाणता राजा’ असा उल्लेख केला” असं संजय नार्वेकर म्हणाले.