सातारा – वाढेफाटा येथील हॉटेल ई लाईटमध्ये हा प्रकार दि. ९ फेब्रुवारी ते दि. १४ फेब्रुवारी या कालावधीत राहण्याचे व जेवणाचे ३४ हजार ७०० रुपये पेमेंट अकाऊंटद्वारे पाठवल्याचे भासवून तसे मेसेज पाठवले.
मात्र, आजपर्यंत ते पेमेंट दिले नसल्याने हॉटेलचे मालक कौस्तुभ दिलीप मोरे यांची फसवणूक झाली आहे. याप्रकरणी पंकज गणपत बाबर (रा. चऱ्होली खुर्द, पिंपरी चिंचवड, मूळ रा. जकातवाडी, ता. सातारा) याच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. याप्रकरणी रोहित शिवराम भोसले (रा. मंगळवार पेठ, सातारा) याने शाहूपुरी पोलीस ठाण्यात तक्रारी दिली. सहायक फौजदार माने तपास करत आहेत.