आॅकलड : ‘आगामी टी-२० विश्वचषक स्पर्धेचा विचार करता , भारताविरूध्दची मालिका न्यूझीलंडसाठीही महत्वाचीच आहे. भारत सध्या एक बलाढ्य संघ मानला जात असला, तरी टी-२०, एकदिवसीय आणि कसोटी अशा तीन प्रकारांपैकी दोन मालिका जिंकण्याचा आमचा प्रयत्न असेल. तरच किवीजचे मनोधैर्य उंचावलेले राहील आणि ‘ब्लॅक-कॅप्स’ जिंकतीलच’, असे मत न्यूझीलंडचा माजी कर्णधार क्रेग मॅकमिलन याने व्यक्त केले आहे.
दरम्यान, मायदेशात नुकत्याच आटोपलेल्या आॅस्ट्रेलिया विरूध्दच्या वन-डे मालिकेत २-१ ने विजय मिळवल्यानंतर भारतीय क्रिकेट संघ मंगळवारी न्यूझीलंडमध्ये दाखल झाला. भारतीय संघ पुढील ६ आठवडे न्यूझीलंडमध्ये असणार आहे.
The schedule for the first part of India's NZ Tour 📅 . 3 ODIs and 2 Tests will follow the Twenty20 matches.
T20 Squad | https://t.co/eno2QM2x4a
Tickets | https://t.co/OGIRVUKff7#NZvIND pic.twitter.com/BgKcFZsrT3
— BLACKCAPS (@BLACKCAPS) January 20, 2020
या दौ-यात भारत-न्यूझीलंड दरम्यान पाच टी-२० (२४ जानेवारीपासून), तीन वन-डे (५ फेब्रुवारीपासून) आणि दोन कसोटी (२१ फेब्रुवारीपासून) सामन्यांची मालिका खेळली जाणार आहे.